वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ५. सार्थ अभंग २००१ ते २५००

करूनी चिंतन खेळो भोव

🙏 3. संत तुकाराम · ABH-077991 · अभंग क्र. २२२८

2228.
करूनी चिंतन खेळो भोवताले । चित्त येथे आले पायापाशी ॥१॥
येथे नाही खोटा चालत परिहार । जाणसी अंतर पांडुरंगा ॥धृपद॥
सुखदुःखे तुज देऊनी सकळ । नाही ऐसा काळ केला आम्ही ॥२॥
तुका म्हणे जाला देहाचा विसर । नाही आता पर आप दोन्ही ॥३॥

अर्थ :
देवा तुझे सारखे चिंतन करून करून माझे चित्त आता तुझ्या पाया भवताली खेळत आहे. अरे पांडुरंगा तुला खोटा परिहार देऊन चालणार नाही कारण तु सर्वांचे अंतकरण जाणतो आहेस. देवा आम्ही आमचे सर्व सुखदुःख तुला देऊन टाकले आहे आणि काळाचे खंडण केले आहे. तुकाराम महाराज म्हणतात आता मला देहाचा विसर पडला आहे त्यामुळे माझ्यासाठी कोणी आपले व परके नाही.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग