वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 74. भक्तवत्सलता - अभंग २२०० ते २२६४

अवरोध विरोध करिता हर

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085666 · अभंग क्र. २२२५

2225.
अवरोध विरोध करिता हरिभक्ति । सायुज्यता मुक्ति देणे तया ॥१॥
ऐसा कृपाळू लक्ष्मीच्या पती । पुराणे वर्णिती महिमा ज्याचा ॥२॥
विष पाजु आली पुतना राक्षसी । अक्षयपदासी दिले तिसी ॥३॥
अगबग केशी असुर वधिले । सायुज्यता दिले पद त्यासी ॥४॥
एका जनार्दनी भक्तांचा कैवारी । ब्रीद हे साचारीं मिरवितसें ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग