अष्टांग योग साधिती स
2208.
अष्टांग योग साधिती साधनी । तो हारिकीर्तनी नाचे बापा ॥१॥
यज्ञादिकी अवदान नेघे वो माये । तो उभा राहुनी क्षीरापती खाये ॥२॥
पवन कोंडोनि योगी जाती निराकारीं । तो हरि धर्माघरीं पाणी वाहे ॥३॥
सनकनंदन जया ध्याताती आवडी । तो अर्जुनाची घोडीं धुतो हरि ॥४॥
एका जनार्दनी भक्तांच्या अंकित । म्हणोनि तिष्ठत विटेवरी ॥५॥
