परउपकारे कायावाचामन
2201.
परउपकारे कायावाचामन । वेची सुदर्शन रक्षी तया ॥१॥
याजसाठी असे योजिले श्रीपति । संकल्पाचे हाती सर्व जोडी ॥धृपद॥
परपीडे ज्याची जिव्हा मुंडताळे । यमदूत डाळे करिती पूजा ॥२॥
तुका म्हणे अंबॠषी दुर्योधना । काय झाले नेणा दुर्वासया ॥३॥
अर्थ :
जे नेहमी दुसऱ्यावर पर उपकार करण्यासाठी आपली काया-वाचा-मन हे तत्पर ठेवत असतात आपले शरीर झिजवत असतातव त्याचे रक्षण भगवंताचे सुदर्शनचक्र करीत असते. यासाठीच सुदर्शन चक्राची योजना केली आहे आणि जसा मनुष्याच्या मनात संकल्प असेल त्याप्रमाणेच त्याला त्याच्या इच्छा प्राप्त होत असतात. ज्याची वाणी नेहमी दुसर्याची पिडा निंदा करण्यात सरसवते त्याच्या डोक्यात यमदूत खेटरे मारून त्याची पूजा करत असतो. तुकाराम महाराज म्हणतात अंबरीश राजाला शाप देणाऱ्या दुर्वास ऋषीचा आणि पांडवाचा छळ करणाऱ्या दुर्योधनाची सूदर्शनाने कशी स्थिती केली हे तुम्हाला माहित नाही का?
