झांकावले डोळे शंका क
2227.
झांकावले डोळे शंका करी मनी । दिवस की यामिनी हे न कळे ॥१॥
महा तेज:पुंज फांकती सकळ । सिंधूचा झळाळ भोंवताला ॥२॥
गोमती ते नदी निर्मळ वाहात । बहु घुमघुमीत सुमने भार ॥३॥
जाईजुई आणि कमळ कल्हारी । भ्रमर झुंकारी गुंजारव ॥४॥
नामा म्हणे मुनि पातला पूर्वद्वारा । पुढिल्या विचारा चित्त द्यावे ॥५॥
