वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 74. भक्तवत्सलता - अभंग २२०० ते २२६४

एका घरी द्वारपाळ । ए

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085679 · अभंग क्र. २२२०

2220.
एका घरी द्वारपाळ । एक घरी होय बाळ ॥१॥
एका घरी करी चोरी । एका घरे होय भिकारी ॥२॥
एका घरी युद्ध करी । एका घरी पूजा बरी ॥३॥
एका घरी खाय फळे । एका घरी लोणी बळे ॥४॥
एका एकपणे एकला । एका जनार्दनी प्रकाशला ॥५॥
२२२१
एकाचिया चाडें । उगवी बहुतांचीं कोडे ॥१॥
म्हणोनि उभा विटेवरी । पाउले समचि साजिरी ॥२॥
एकासाठीं गर्भवास । एकाद्वारीं रहिवास ॥३॥
एका घरी उच्छिष्ट काढी । एकाची रणी धुत घोडीं ॥४॥
एका द्वारी भिकारी होय । एका घरी भाजी खाय ॥५॥
एका एकपणे हरी । एका जनार्दनी दास्य करी ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग