वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ५. सार्थ अभंग २००१ ते २५००

समुद्रवळयांकित पृथ्व

🙏 3. संत तुकाराम · ABH-078218 · अभंग क्र. २२१४

2214.
समुद्रवळयांकित पृथ्वीचे दान । करिता समान न ये नामा ॥१॥
म्हणऊनि कोणी न करावा आळस । म्हणा रात्रीदिवस रामराम ॥धृपद॥
सकळ ही शास्त्रे पठण करता वेद । सरी नये गोविंदनाम एके ॥२॥
सकळ ही तीर्थे प्रयागादी काशी । करिता नामाशी तुळेति ना ॥३॥
कर्वती कर्मरी देहासी दंडण । करिता समान नये नामा ॥४॥
तुका म्हणे ऐसा आहे श्रेष्ठाचार । नाम हे चि सार विठोबाचे ॥५॥

अर्थ :
एखाद्याने समुद्राला वलायांकित करून पृथ्वीचे दान जरी केले तरी त्याची तुलना नामाशी होऊ शकत नाही. म्हणून कोणीही आळस न करता रात्रंदिवस राम राम या नामाचा जप करत राहावे. सर्व वेदशास्त्र पठण केले तरीदेखील त्याला गोविंदाच्या एका नामाची सर येत नाही. सर्वतीर्थ प्रयाग काशी इत्यादी केले तरी त्याची तुलना नामाशी करता येत नाही. कर्माने देहाला दंड जरी दिला तरी त्याची तुलना नामाशी होऊ शकत नाही. सर्व साराचे हे सार म्हणजे विठोबाचे नाम आहे असे वेदपठण करणाऱ्या श्रेष्ठांचा आचार आहे त्यामुळे सर्व साधनाचे सार हे विठोबाचे नामच आहे हे सिद्ध होते.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग