ऐसा तो ब्राह्मण दरिद
2215.
ऐसा तो ब्राह्मण दरिद्रे पीडिला । सदा स्वरूपी झाला अखंडीत ॥१॥
न करीच खंती कांही तो अंतरी । वाचे तो उच्चारी रामकृष्ण ॥२॥
नाही धड घर केवळ जर्जर । चंद्र प्रभाकर उगवती ॥३॥
बाळे पांच सात बाहाती झोंबती । भुके तळमळिती सर्वकाळ ॥४॥
उष्णे पोळे वारा येतसे भरारा । मेघाचिया धारा घरामाजी ॥५॥
नामा म्हणे त्याने प्रपंच सांडिला । परमार्थ मांडिला अखंडीत ॥६॥
