पाहे तिकडे दिशा ओस ।
2230.
पाहे तिकडे दिशा ओस । अवघी आस पायापे ॥१॥
मनिचे साच होईल कई । प्रमे देई भेटोनि ॥धृ॥
सर्वापरि पागुळ असे । न कळे कैसे ते तुम्हा ॥२॥
तुका म्हणे कृपावंता । तू तो दाता दीनाचा ॥३॥
अर्थ :
देवा जिकडे पहावे तिकडची दिशा मला सर्व ओसच दिसत आहे आता मला केवळ तुझ्या पायाचे दर्शन घडावे एवढीच इच्छा आहे. देवा माझ्या मनातील इच्छा कधी सत्यत्वास येईल हे मला काही समजत नाही परंतु तु मला भेट देऊन मला तुझे प्रेम द्यावे एवढी इच्छा मात्र आहे. देवा मी सर्वपरीने म्हणजे ज्ञानाने क्रियेने पागळा झालेलो आहे हे तुम्हाला कसे कळत नाही. तुकाराम महाराज म्हणतात हे कृपावंता अरे तु तर दिनांचा दाता आहेस.
