प्रारब्धाच्या बळे दे
2214.
प्रारब्धाच्या बळे देहाचे वर्तने । काळचक्र भोवने जैसे कांही ॥१॥
तैसाची तो साधु जाणावा प्रसिद्धु । देहाचा संबंधु नेणे कांही ॥२॥
वारे वाजूनिया जाता वृक्ष डोले । मर्यादेवेगळे होत जाय ॥३॥
नामा म्हणे होणे जाणे नाही तया । संचिता साराया लागोनिया ॥४॥
