आह्मी नामाचे धारक ने
2216.
आह्मी नामाचे धारक नेणो प्रकार आणीक । सर्व भावे एक विठ्ठल चि प्रमाण ॥१॥
न लगे जाणावे नेणावे गावे आनंदे नाचावे । प्रेमसुख घ्यावे वैष्णवांचे संगती ॥धृपद॥
भावबळे घालू कास लज्जा चिंता दवडू आस । पायी निजध्यास म्हणो दास विष्णूचे ॥२॥
भय नाही जन्म घेता मोक्षसुखा हाणो लाता । तुका म्हणे सत्ता धरू निकट सेवेची ॥३॥
अर्थ :
आम्ही नामाचे धारक आहोत नामा वाचून इतर कोणताही प्रकार आम्हाला माहीत नाहीत. आणि एक विठ्ठलच आम्हाला सर्व भावे प्रमाण होत आहे. या देवाला जाणण्याची नेणण्याची काहीच गरज पडत नाही केवळ त्याच्या छंदामध्ये आनंदात नाचावे व त्याचे गुणगात राहावे. फक्त वैष्णवांच्या संगतीमध्ये प्रेम सुख घेत राहावे. हरी विषयी भक्तिभावाची बळकट कास घालू आणि लाज चिंता इच्छा याला आम्ही तोडून टाकु. या हरीचे चरण आम्ही नित्य स्मरणात ठेऊ आणि स्वतःला विष्णुचे दास म्हणून घेऊ. तुकाराम महाराज म्हणतात जन्म घेण्या विषय आम्हाला भय किंचितही वाटत नाही याउलट आणि मोक्षाला सुखाने लाथा मारू. आणि आम्ही आमच्या सत्तेने हरिच्या निकट आम्ही राहून त्याची सेवा करत राहू.
