द्विज म्हणे जाता मनी
2225.
द्विज म्हणे जाता मनी । कैसा भेटे चक्रपाणी ॥१॥
काय होईल न कळे । म्हणोनि ह्रदयी कळवळे ॥२॥
येवढा ज्याचा राज्यभार । मी तो केवळ फकीर ॥३॥
कोठे तयाला आठव । बाळपणींचे माझे नांव ॥४॥
तै तो होता गौळ्याघरी । आता त्रैलो. क्याधिकारी ॥५॥
नामा म्हणे ऐसे । करितचि निजध्यास ॥६॥
