वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ५. संत नामदेव गाथा :- भाग ५ पौराणिक चरित्रे › 229. धृवचरित्र

येरु तो निवांत होउनी

🙏 4. संत नामदेव · ABH-083932 · अभंग क्र. २२०१

2201.
येरु तो निवांत होउनी त्याठायी । राहोनिया कांही करिता झाला ॥१॥
न कळे भक्तिभाव घ्यावे कैसे त्यासी । देव कोण त्यासी ठावे नाही ॥२॥
भावार्थाने सर्व इंद्रिये खुंटली । प्रारब्धाने दिल्ही वाट तया ॥३॥
साध्यसाधनाचा उपाव कळेना । घ्यान तो धारणा कौंचि तेथे ॥४॥
नामा म्हणे गुरु करावा ते नेणे । अद्‌भुत विंदान मांडियेले ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग