वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ५. संत नामदेव गाथा :- भाग ५ पौराणिक चरित्रे › 231. सुदामचरित्र

चालिला देवाचे भेटीला

🙏 4. संत नामदेव · ABH-083962 · अभंग क्र. २२३१

2231.
चालिला देवाचे भेटीला सन्मुख । ब्राम्हणाचा हरिख न समाये ॥१॥
पाहाता लोचनी राजीवलोचन । भावाचे मोचन तेचि काळी ॥२॥
सभा ते साजिरी रत्न सिंहासनी । देव चुडामणी शोभतसे ॥३॥
राईरखुमाई चामरे ढाळिती । राधा उभी हाती घेउनी छत्र ॥४॥
समारंभे पुढे गरुड तो उभा । शोभतसे शोभा दिव्य कांही ॥५॥
यादवांची सभा दाटलीसे भारी । नाना उपचारी रिद्धी सिद्धी ॥६॥
उद्धव अक्रूर उभे पायांपासी । देवादिदेवासी विडे देत ॥७॥
नामदेव तेथे उभा होता निका । घेऊनि पादुका दोन्ही हाती ॥८॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग