वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ५. संत नामदेव गाथा :- भाग ५ पौराणिक चरित्रे › 230. उपमन्यूचें चरित्र

उपमन्युचे चरित्र.

🙏 4. संत नामदेव · ABH-083994 · अभंग क्र. २२१२

2212.
उपमन्युचे चरित्र.

ऐका श्रोते सावधानता । सांगेन उपमन्युची कथा । एक्या भावे परिसता । सायुज्यता पाविजे ॥१॥
बाळ तो लडिवाळ तान्हा । वाढे मातेचिया स्तन पान्हा । परि ते असे दुर्बळपणा । उपमन्यु नांव तयेचे ॥२॥
उपमन्ये मागितले । कृष्णे तयासी काय दिधले । ते सांगेन वहिले । चित्त देउनी परियेसा ॥३॥
ब्राम्हणासी एक पुत्र झाला । पितयाने संतोप मानिला । थोर कष्टे वाढविला । तयाचे पुत्रपण फिटले ॥४॥
बाळ जाहला जाणता । पितयासी उपजली दूधाची चिंता । दूधच ऐकिले बोलता । तेंचि मातेसी मागत ॥५॥
मग कर्डी कांडोनी जनकजननी । त्याचे केले शुभ्रपाणी । बाहेर दूध म्हणउनी । वाटींत भात कालविला ॥६॥
तंव शेजारी ब्राम्हणाने श्राद्ध केले । त्याने त्या वाळकास जेवावयास नेले । षड्रस पक्कान्ना वाढिले । दूध क्षीर नाना परीचे ॥७॥
तयासी वाढिली दूध क्षीरी । बाळक जेविले पोटभरी । पुसोनिया तये घरी । माते मागू जेवावया ॥८॥
गेला आपुलिया घरा प्रती । बाळ तो निद्रा करी राती । प्रात:काळी भूक लागे मागुती । मागे दूधभात जेवावया ॥९॥
पुढती कर्डी वाटूनि जननी । त्याचे काढिले शुभ्र पाणी । येते टाकिले थुंकोनी । माते धूध कालचे नव्हे ॥१०॥
बारे त्या समर्थाचे घरी । देवे दिधले दूध क्षीरी । आम्हा दुर्बळाचे घरी । ते दूध कोठूनि मिळेल ॥११॥
कोठे आहे तो श्रीहरी । तो मज दावी वो झडकरी । दूध मागेन निर्धारी । क्षूधा अंतरी बहु पीडी ॥१२॥
देव्हारा श्रीहरिची मूर्ती । नेउनी दाखविली बाळाप्रती । बारे हा लक्ष्मीपति । दूध या प्रती मागावे ॥१३॥
बाळ खळ घेउनी बैसला तेथे । देवा दूध पोटभर दे माते । मी कोठे जाऊ जेदी तूते । दूध घेतल्यावांचोनी ॥१४॥
ऐसे तिघा तीन उपवास पडती । माता पिता चिंता करिती । लोकी मिळोनी बहुती । उठवू पाहती बाळकाते ॥१५॥
बाळा तुजकारणे । एकगाय देतो आणुन । येरु न मानी त्यांचे वचन । म्हणे देईल लक्ष्मीरमण मजलागी ॥१६॥
माता समजावी बहुता वचनी । त्या ब्राम्हणाचे दूध देते आणुनी । हे पाहे पांचाखोनी । दूध कालचे होय की नव्हे ॥१७॥
दूध आणिले भीक मागुनी । संतोष न वाटे माझे मनी । देव देईल मज लागुनी । तरी दूध सेवीन ॥१८॥
देवे धुरूसी अढळपद दिले । तैसेंच दूध देई मज संचले । न देता अव्हेरिले । तरी प्राण देईन निर्धारी ॥१९॥
देवा दुधाची शिधोरी । का मज न देसी श्रीहरी । आळ पुरवी बा मुरारी । दूध पोटभरी मज देई ॥२०॥
मज बहु लगलीसे क्षुधा । अझुनी का न पावसी गोविंदा । तुज मागत नाही धनसंपदा । एका दूधा वांचोनी ॥२१॥
देवा नको पाहू निर्वाण । देहकरवती घालीन । प्राण तुज समर्पीन । सत्य वचन पाहे माझे ॥२२॥
देखोनी बाळकाचे अंत:करण । कळवळिला नारायण । सांडोनी क्षीरसागर शेषशयन । येत धांवून बाळकाप्रती ॥२३॥
सुदर्शन घेऊनि हाती । पावला उपमन्यु आकांती । प्रगट झाली विष्णूमूर्ती । निजरूप दाविले ॥२४॥
बाळ येऊनि लागला चरणी । देवे ह्रदयी धरिला आलिंगुनी । वरदहस्ते कुरवाळुनी । कृपाद्दष्टी अवलोकी ॥२५॥
सांग बाळा प्रसन्न झालो तूंते । काय संकल्प तो माग माते । येरू म्हणे दूध द्यावे कृपावंते । जे कल्पांतींही न सरेची ॥२६॥
हांसून बोले वैकुंठरमण । पहावो बाळ केवळ अज्ञान । म्हणे मी झालो आता प्रसन्न । काय दूध तुवा मागावे ॥२७॥
देवा या दुधाचि कारणे । एवढे केले म्या निर्वाण । सहित मातापिता तिघेजण । क्षीर भोजन मज द्यावे ॥२८॥
माता पिता उपमन्य । निघे गरूड पृष्ठी वाहवून । क्षीरसागरी ठेवी नेऊन । दूध प्राशन सुखे करा ॥२९॥
राज्य देउनी क्षीरसागरीचे । अमर शरीर केले त्यांचे । अखंड दर्शन श्रीहरीचे । सायुज्यपद त्या दीधले ॥३०॥
यालागी काया वाचा मने । जावे विठोबासी शरण । आर्त मनोरथ पूर्ण । निजभक्ताचे करीतसे ॥३१॥
विष्णुदास नाम्याचा स्वामी । तो श्रीहरी वोळगा तुम्ही । जे जे इच्छिले अंतर्यामी । इच्छा दानी पुरवील ॥३२॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग