भक्तवत्सलता - अभंग २
2200.
भक्तवत्सलता - अभंग २२०० ते २२६४
जी जी भक्त बोलतीं वचनें । ती ती प्रमाण करणे देवा ॥१॥
याजसाठीं अवतार । धरी मत्स्य कांसव सुकर ॥२॥
भक्तवचना उणेंपण । येऊ नेदी जाण निर्धारे ॥३॥
स्वये गर्भवास सोशी । अंबऋषीकारणें ॥४॥
एका जनार्दनी ब्रीद साचा । वागवी भक्ताचा अभिमान ॥५॥
