वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ५. सार्थ अभंग २००१ ते २५००

का रे नाठविसी कृपाळु

🙏 3. संत तुकाराम · ABH-077998 · अभंग क्र. २२२६

2226.
का रे नाठविसी कृपाळु देवासी । पोसितो जनासी एकला तो ॥१॥
बाळा दुधा कोण करिते उत्पत्ती । वाढवी श्रीपति सवे दोन्ही ॥धृपद॥
फुटती तरुवर उष्णकाळमासी । जीवन तयांसी कोण घाली ॥२॥
तेणे तुझी काय नाही केली चिंता । राहे त्या अनंता आठवूनि ॥३॥
तुका म्हणे ज्याचे नाम विश्वंभर । त्याचे निरंतर ध्यान करी ॥४॥

अर्थ :
अरे सर्व जगाला जो एकटाच पोसतो अशा कृपाळू देवाची तु आठवण का करत नाहीस? अरे गर्भा मधील बालकाला कोण पोसते आणि त्याची भूक भागवण्यासाठी दुधाची उत्पत्ती कोण करते तर अर्थात हा श्रीपती करतो, तो गर्भात असलेल्या मुलाचे आणि स्तनात दुधाचे दोन्ही वाढवण्याचे काम करतो. भर उन्हाळ्यात झाडांना पालवी फुटते मग त्यांना पाणी घालण्याचे काम कोण करते? अरे त्या आनंताने तुझी चिंता केली नाही की काय अर्थात केलेली आहे त्यामुळे त्याला आठवून तु निश्चिंत राहा. तुकाराम महाराज म्हणतात ज्याचे नावच विशंभर आहे त्याचे तु निरंतर ध्यान करीत रहा.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग