ज्यासी प्रतिज्ञा निर
2222.
ज्यासी प्रतिज्ञा निर्धारी । देवा हारी आणियेलें ॥१॥
तो हा शांतनूचा रावो । भीष्म देवो संग्रामी ॥२॥
शस्त्र न धरें ऐसा बोलु । साचा केला संग्रामी ॥३॥
विकल पडतांचि अर्जुन । धरिले सुदर्शन हस्तकी ॥४॥
ऐसा कृपेचा कळवळा । एका जनार्दनी पाळी लळा ॥५॥
