दयाळु उदार पंढरीराव
2213.
दयाळु उदार पंढरीराव । भाकितां कवि पुरवी इच्छा ॥१॥
ऐसा याचा अनुभव । आहे ठाव मागोनियां ॥२॥
जे जे होती शरणागत । पुरवी आर्त तयाचे ॥३॥
उपमन्यु ध्रुव बाळ । दिधले अढळपद त्यांते ॥४॥
पुराणीं तो व्यासें बहु । वर्णिलें दावु कासया ॥५॥
एका जनार्दनी एकचि भाव । तेणे देव तुष्टता ॥६॥
