काय सर्प खातो अन्न ।
1971.
काय सर्प खातो अन्न । काय ध्यान बगाचे ॥१॥
अंतरींची बुद्धि खोटी । भरले पोटी वाईट ॥धृपद॥
काय उंदीर नाही धावी । राख लावी गाढव ॥२॥
तुका म्हणे सुसर जळी । काउळी का न न्हाती ॥३॥
अर्थ :
सर्प कधी अन्न खातो काय आणि बगळा शांत बसतो म्हणजे तो ध्यानाला बसलेला असतो काय याचाअर्थ : काही लोक अन्न खात नाही म्हणजे तो परमार्थ झाला का किंवा काही लोक ध्यानाला बसल्याचे ढोंग करतात मग ते खरोखर मनापासून ध्यान करतात काय. तर नाही कारण त्यांच्या पोटात नेहमी वाईटच विचार असतात वर वर फक्त ते उपाशी राहतात किंवा ध्यान करण्याचे सोंग करतात त्यामुळे त्यांची बुद्धी खोटी आहे. काही लोक गुहेत जाऊन ध्यानाला बसतात तर काही लोक अंगाला राख लावून स्वतःचा दांभिकपणा दाखवतात मग असे असेल तर उंदीरही बीळात जातो आणि गाढव उकूरड्यावर लोळून स्वतःच्या अंगाला राख फासून घेतो मग तेही परमार्थिक झाले काय ? तुकाराम महाराज म्हणतात तीर्थजळा मध्ये स्नान केल्यावर जर पाप नाहीसे होत असतील तर मग गंगेत मगर नेहमीच असते आणि कावळे काय गंगेत स्नान करत नाहीत काय तेही करत असतातअर्थात जर परमार्थ दांभिक पणाने आणि सोंगाढोंगाने केला तर त्याचा काहीच उपयोग होत नाही.
