भक्तीविणे जिणे जळो ल
1984.
भक्तीविणे जिणे जळो लाजिरवाणे | संसार भोगणे दुःखरूप ॥१॥
एक एक योनि कोटि कोटि फेरा | मनुष्य देवारा मग लागे ॥२॥
वीस लक्ष योनि वृक्षामध्ये घ्याव्या | जळचरी भोगाव्या नव लक्ष ॥३॥
अकरा लक्ष योनि किरडामध्ये घ्याव्या | दश लक्ष भोगाव्या पक्षामध्ये ॥४॥
तीस लक्ष योनि पशूंचिये घरी | मानवाभीतरी चारी लक्ष ॥५॥
नामा म्हणे तेव्हा नरदेह् या नरा | तयाचा मातेरा केला मूढे ॥६॥
