देहाचे ममत्व जंव नाह
1983.
देहाचे ममत्व जंव नाही तुटले | जंब नाही विटले विषयी मन ॥१॥
तंववरी निजसुख कैसेनि आतुडे | जंववरी न झडे मीतूंपण ॥२॥
मीचि एक भक्त मीचि एक मुक्त | म्हणविती पतित दुराचारी ॥३॥
नामा म्हणे तुझे कृपेविण देवा | केवि जोडे ठेवा विश्रांतीचा ॥४॥
