गुंतलों प्रपंचीं सोड
1975.
गुंतलों प्रपंचीं सोडवी गा देवा । देई तुझी सेवा जीवेंभावें ॥१॥
न लगे धन मान पुत्र दारा वित्त । सदां पायी चित्त जडोनि राहो ॥२॥
वैष्णवांचा दास कामारी निःशेष । हेचि पुरवी आस दुजे नको ॥३॥
एका जनार्दनी करीत विनंती । मागणें श्रीपति हेंचि द्यावे ॥४॥
