वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ४. संत नामदेव गाथा :- भाग ४ › 201. संसारीकांस उपदेश

संसाराचे दुःख सुख म्

🙏 4. संत नामदेव · ABH-081989 · अभंग क्र. १९६७

1967.
संसाराचे दुःख सुख म्हणो नये | पुढे दुःख पाहे अनिवार ॥१॥
तया दुःख नाही अंतपार जाणा | काळाची यातना बहुतांपरी ॥२॥
संसाराची चिंता वाहता जन्म गेला | सोस हा वाढला बहुतांपरी ॥३॥
हितहि बुडाले परत्र दुरावले | नरदेह बुडविले भजनेंविण ॥४॥
भजनाच्या प्रतापे दुःख दुरी जाय | जैसे अभ्र होय देशधडी ॥५॥
वायुच्या झुंझाटे वृक्ष उन्मळती | परी माना गति तैसे दुःख ॥६॥
नामा म्हणे नाम दुःखाचा परिहार | सुखाचा अनिवार पार नाही ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग