वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ४. संत नामदेव गाथा :- भाग ४ › 201. संसारीकांस उपदेश

हरिविण जिणे व्यर्थचि

🙏 4. संत नामदेव · ABH-082013 · अभंग क्र. १९८८

1988.
हरिविण जिणे व्यर्थचि संसारी | जग अलंकारी मिरवीत ॥१॥
देवाविण शब्द लटके करणे | भांडा रंजविणे सभेमाजी ॥२॥
आचार करणे देवाविण जो गा | सर्पाचिया अंगा मृदुपण ॥३॥
नामा म्हणे काय बहु बोलो फार | भक्तीविण नर अभागी तो ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग