सर्वाभुतीं तुझे रुप
1988.
सर्वाभुतीं तुझे रुप । हृदयी सिद्धची स्वरुप ॥१॥
इतुलें देई अधोक्षाजा । नाही तरी घोट भरीन तुझा ॥२॥
सकळांहुनी कई सान । सकळिका समसमान ॥३॥
सदा द्यावा संतसंग । अखंड कीर्तनी अनुराग ॥४॥
निःशेष दवडोनियां स्वार्थ । अवघा करी परमार्थ ॥५॥
एका जनार्दनी मागे । नाही तरी घाला घालीन अंगे ॥६॥
