देव तुष्टला मय दे घे
1990.
देव तुष्टला मय दे घे । तुजावांचुनी कांही नेघे ॥१॥
देवा इतुली कृपा करी । जो मी तुझा घोट भरीं ॥२॥
आणिक कांही मागेन जरी । तरी मज दंडावें हरी ॥३॥
वैकुंठ देई रे एका । तो तंव फोडीव फटका ॥४॥
क्षीरसागर शेषशयन । इतुके न दे चाळवण ॥५॥
सोहं पद विसावून । देता घेता लाजिरवाणे ॥६॥
एका जनार्दनी तुष्टला । सकल सर्वांगी घोटला ॥७॥
