भुक्ति मुक्ति सिद्धि
1981.
भुक्ति मुक्ति सिद्धि यावयाकारणे | सेवकाशी देणे पांडुरंगा ॥१॥
ऐसिया तुज सांगणे आपणाते म्हणविती | तया अधोगति कल्पकोडी ॥२॥
देहो सरल्या मिळे ज्योतिस ज्योति | ऐसे म्हणता किती सितरिले ॥३॥
नामा म्हणे ऐसे नाशिवंत शरीर | पूजा हरिहर एक वेळा ॥४॥
