ऐके गा हृषीकेशी । जा
1997.
ऐके गा हृषीकेशी । जाणोनि तुं विश्वासी । निजगुह्मा तुजपाशी । ठेवणे दिधले ॥१॥
आम्हा चाळवोनि विषयासी । थितें बुडवूं पाहासी । क्रियानष्ट होसी तूंचि येक ॥२॥
आमुचे आम्हा देता । तुज का नये चित्ता । लाजसी तत्त्वता । भक्ति घेसी ॥३॥
नेतां पंचापाशी । भले नव्हे हृषीकेशीं । मजसी समान होसी । एका जनार्दनी ॥४॥
