वेव्हाराच्या ठाई । त
1998.
वेव्हाराच्या ठाई । तुझे न चले कांही । मी तू दोघे पाही । सरिसें तेथे ॥१॥
ठेविले बुडविसी । शेखी जाबही न देसी । ऐकोन नायकसी । गहिंसपणें ॥२॥
खवळलों तरी जाण गिळीन मीतूंपण । तेथे देवपण । उडवीन तुझे ॥३॥
जो सांगे पांचापाशीं । त्याचे तोडं तू धरिसी । ठकडा कैसा होसी । म्हणे एका जनार्दनी ॥४॥
