विषयाचा आंदणा दिसे क
1982.
विषयाचा आंदणा दिसे केविलवाणा | करीतसे कल्पना नानाविध ॥१॥
कुटुंब पाईक म्हणवी हरिचा दास | मागे ग्रासोग्रास दारोदारी ॥२॥
जळो त्याचे कर्म जळो त्याचा धर्म | जळो तो आश्रम जाणिवेचा ॥३॥
कल्पद्रुमातळी काखे घेऊनि झोळी | बैसोनि सांभाळी भिक्षा अन्न ॥४॥
अधम पोटभरी विचार तो न करी | पुढती दारोदारी हिंडो जाय ॥५॥
पोटालागी करी नाना विटंबना | संतोषनी मना दुर्जनांच्या ॥६॥
न करी हरिचे ध्यान बैसोनि एकांती | जन्माची विश्रांति जेणे होय ॥७॥
द्रव्याच्या अभिलाषे जागे सटवीपाशी | नवजे एकादशी जागरणा ॥८॥
उत्तम मध्यम अधम न विचारी | स्तुति नाना करी आशाबद्ध ॥९॥
वैराग्याची वार्ता कैची दैवहता | नुपजे सर्वथा प्रेमभाव ॥१०॥
नामा म्हणे ऐसे तारी एक्या गुणे | अजा आरोहण गजस्कंधी ॥११॥
