धनमानवळे नाटविसी देव
1980.
धनमानवळे नाटविसी देवा | मृत्युकाळी तेव्हा कोण आहे ॥१॥
यमाचे यमदंड वैसतील माथा | तेव्हा तुज रक्षिता कोण आहे ॥२॥
मायबाप बंधु तोंवरी सोयरी | इंद्रिये जोंबरी वाहताती ॥३॥
सर्वस्व स्वामिनी म्हणविसी कांता | तेहि केश देता रडतसे ॥४॥
विष्णुदास नामा जातांचि शरण | स्वप्नी जन्ममरण नाही नाही ॥५॥
