वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ४. सार्थ अभंग १५०१ ते २०००

तेणे वेशे माझी चोरिल

🙏 3. संत तुकाराम · ABH-079956 · अभंग क्र. १९८०

1980.
तेणे वेशे माझी चोरिली अंगे । मानावया जग आत्पपणे ।
नाही चाड भीड संसाराचे कोड । उदासीन सर्व गुणे ।
भय मोह लज्जा निरसली शंका । अवघिया एकचि पणे ।
विठ्ठलाच्या पायी बैसोनि राहिली । भागली नुटित तेणे ॥१॥
आता त्यासी काय चाले माझे बळ । जालोसे दुर्बळ सत्वहीन ।
दग्ध पट दिसे संगति बरवंट । काय त्याचे कारण ॥धृपद॥
आळसे दृष्टी न पाहे आपुले । एकचि देखिले सर्वरूप ।
मानामान तेथे खुंटोनि राहिले । पिसुन तो कोण बाप ।
ज्योति ना अंधार अवघा एकंकार । तेथे काय पुण्यपाप ।
विठ्ठलावाचुनि काही च नावडे । वेगळाल्या भावे रूप ॥२॥
बळबडिवार लौकिक वेव्हार । गेली आशा तृष्णा माया ।
सुखदुःखाची वार्ता नाइके । अंतरलो दुरी तया ।
मी तू पणा निष्काम होऊनि । राहिलो आपुलिया ठाया ।
तुजविण आता मज नाही कोणी । तुका म्हणे देवराया ॥३॥

अर्थ :
त्या हरीनेच माझे स्थुल व सूक्ष्म अंग चोरले आहेत आणि सर्व जगच आता आप्त सोयरे झाले आहेत. त्यामुळे मला आत्ता संसाराची आवडत त्याविषयी कोणत्याही प्रकारची भिड आणि कोणत्याही प्रकारची शंका राहिली नाही. माझ्या ठिकाणी उदासीनता आली आहे. आता भय, मोह, लज्जा, शंका या सर्वाचे निरासन झाले आहे सर्वत्र मला एक हरीच दिसत आहे. सर्व प्रकारचे भोग भोगुन माझे इंद्रिय आता विठ्ठलाच्या पायी स्थिर झाले आहेत आता विठ्ठलाच्या पायापासून ते थोडा वेळ देखील उठत नाही आता मी पूर्णपणे उदासीन झालो आहे त्यामुळे माझे तेथे बळ काय चालणार आहे मी आता दुर्बळ शक्तीहिन झालो आहे. जळालेल्या वस्त्रांची घडी व्यवस्थित दिसते परंतु त्याचा काही उपयोग होत नाही त्याप्रमाणे माझे ही �

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग