वरपांग सोंग नको माळा
1973.
वरपांग सोंग नको माळा मुदी । ठाव संतपदी देई देवा ॥१॥
प्रेमभाव देई प्रेमभाव देई । मागणें दुजे नाही आणिक ते ॥२॥
नाम मुखी सदा संतांचा सांगात । प्रेम हृदयांत विठोबाचे ॥३॥
एका जनार्दनी हा माझा निर्धार । जन्माची वेरझार तोडी देवा ॥४॥
