प्रपंच स्वार्थास साध
1969.
प्रपंच स्वार्थास साधावया चांग | वैराग्याचे अंग दाविसी जना ॥१॥
अनुताप नित्य नाही कदाकाळी | मग संचिताची होळी कैसी होय ॥२॥
पवित्र ते वाचा का रे गमविसी | रामनाम न म्हणसी अरे मूढा ॥३॥
नामा म्हणे जीव कासया ठेवावा | न भजता केशवा मायबाप ॥४॥
