दुर्लभ नरदेह् जाला त
1977.
दुर्लभ नरदेह् जाला तुम्हा आम्हा | येथे साधू प्रेमा राघोबाचा ॥१॥
अवघे हातोहाती तरो भवसिंधु | आवडी गोविंदु गाऊ गीती ॥२॥
हिताचिया गोष्टी सांगू एकमेका | शोक मोह दुःख निरसू तेणे ॥३॥
एकमेका करू सदा सावधान | नामी अनुसंधान तुटी नेदू ॥४॥
घेऊ सर्वभावे रामनाम दीक्षा | विश्वासे सकळिका हेंचि सांगो ॥५॥
नामा म्हणे शरण रिघो पंढरिनाथा | नुपेक्षी सर्वथा दीनबंधु ॥६॥
