देह आहे तंत्र करा रे
1975.
देह आहे तंत्र करा रे धांवणी | शरण चक्रपाणि रिघा वेगी ॥१॥
येर ते लटिके इष्टमित्र सारखे | हे तंत्र पारिखे सवचोर ॥२॥
लावुनि मोहाते दास्यत्व करविती | अंतकाळी होती पाठिमोरी ॥३॥
मायेचे भुररे भुलवी सकळ | हे तुज न कळे कटकटा ॥४॥
यापरी आयुष्य लोटले रे जना | पुढे यमयातना न चुकती ॥५॥
धोतरा देऊनी सर्वस्व हरीती | नामा म्हणे गती हेची जना ॥६॥
