शेवटिली पाळी तेव्हा
1985.
शेवटिली पाळी तेव्हा मनुष्यजन्म | चुकलिया वर्म फेरा पडे ॥१॥
एक जन्मी ओळखी करा आत्मारामा | संसार सुगम भोगू नका ॥२॥
संसारी असावे असोनि नसावे | कीर्तन करावे वेळोवेळा ॥३॥
नामा म्हणे विठो भक्ताचिये द्वारी | घेऊनिया करी सुदर्शन ॥४॥
