भक्तीविण मोक्ष नव्हे
1987.
भक्तीविण मोक्ष नव्हे हा सिद्धांत | वेद बोले हात उभारोनि ॥१॥
जगी तेंचि ज्ञान जाणाया लागुनि | संता वोळगोनि वश्य कीजे ॥२॥
प्रपंच हा खोटा शास्त्र निवडिला | पाहिजे साक्षीला सद्गुरु तो ॥३॥
नामा म्हणे सेवा घडावी संतांची घ्यावी कृपा त्यांची तेंचि ज्ञान ॥४॥
