वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ४. संत नामदेव गाथा :- भाग ४ › 201. संसारीकांस उपदेश

जायजाणा देह जाईल नेण

🙏 4. संत नामदेव · ABH-081999 · अभंग क्र. १९७२

1972.
जायजाणा देह जाईल नेणसी | लौकिकी मिरविसी लाजेसिना ॥१॥
माझे माझे माझे मानिसी निभ्रांत | करिसी आघात रात्रंदिवस ॥२॥
सांग तू कोणाचा आलासि कोठोनि | दृढ बुद्धि मनी विचारी पा ॥३॥
धन संपत्ति करोनि मदे मातलासी | पुढत पुढती पडसी गर्भवासी ॥४॥
पुत्र कलत्र दारा यांचा जालासी म्हणियारा | यांच्या पातकांचा भारा बाहसील ॥५॥
अंती यमापाशी बांधोनिया नेती | कवतुक पाहती सकळ जन ॥६॥
नानापरी तुज करिती यातना | सांगे तेथे कोणा बोभाशील ॥७॥
धन पुत्र दारा तुज नये कामा | एका मेघश्यामा वांचोनिया ॥८॥
विषयाचेनि संगे भुलशील झणे | भोगिसी पतने रात्रंदिवस ॥९॥
नामा म्हणे एक ध्यायी कमलापति | निजाचा सांगाति केशवराज ॥१०॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग