नामा म्हणावया तू का
1978.
नामा म्हणावया तू का रे करंटा | काय तुझे अदृष्टी लिहिले असे ॥१॥
यमाचे यमपाश पडतील गळा | जाशील सगळा काळापोटी ॥२॥
शरीराची आशा बाळ है तारुण्य | अवचित वृद्धपण येईल मूढा ॥३॥
लक्ष्मी धन मद पुत्र स्त्री घरदार | नेता यमकिकर न सोडविती ॥४॥
मायबाप सखी न येती सांगाते | जब शरीरी पुरते बळ आहे ॥५॥
न येती मांगाते सज्जन सोयरी | वानप्रस्थ ब्रह्मचारी श्रेष्ठ जाले ॥६॥
घेशील तू सोंग संन्यास आश्रम | सांडोनि घराश्रम न सुटती ॥७॥
नामा म्हणे नाम नित्य नरहरी म्हणता श्रीहरी तरशील ॥८॥
