पुर्वीचिया मतांतरा ।
1972.
पुर्वीचिया मतांतरा । सांपडला बरा आम्हा मार्ग ॥१॥
नाही कोठे गोंवा गुंतीं । ऐसे गर्जती हरिदास ॥२॥
वाचे नाम करे टाळी । साधन कली उत्तम हे ॥३॥
धालों कीर्तनी प्रेमानंदे । वाचे आनंदें गाऊ गीत ॥४॥
एका जनार्दनी धरली कास । नाहे आस दुसरी ॥५॥
