एकचि आशिर्वाद देती ।
1281.
एकचि आशिर्वाद देती ।
जरी अवलोकिती कृपेने ॥१॥
तरी त्या पावविती पदा ।
जेथे सर्वदा रमती मुनी ॥२॥
निश्चयाचे देणे त्याचे ।
हरिती जीवाचे जीवपण ॥३॥
निळा म्हणे अगाध वाचा ।
संत वरदाचा महिमा हा ॥४॥
1281.
एकचि आशिर्वाद देती ।
जरी अवलोकिती कृपेने ॥१॥
तरी त्या पावविती पदा ।
जेथे सर्वदा रमती मुनी ॥२॥
निश्चयाचे देणे त्याचे ।
हरिती जीवाचे जीवपण ॥३॥
निळा म्हणे अगाध वाचा ।
संत वरदाचा महिमा हा ॥४॥