उदार ऐसा न दिसेचि दृ
1277.
उदार ऐसा न दिसेचि दृष्टि ।
पाहताहि सृष्टी मज आता ॥१॥
जयाचीया वचने जीवा जीवपण ।
नुमसेचि शीवपण शिवा अंगी ॥२॥
अविदयेसी अर्हता मावळे ।
बोध भानुउजळे प्रकाशीतु ॥३॥
निळा म्हणे दावी आनंदा आनंदु ।
भोगवी निजानंदु निजानंदा ॥४॥
