वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 65. नाममहिमा - अभंग ११६२ ते १२७२

चित्रगुप्त म्हणती कर

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086523 · अभंग क्र. १२७०

1270.
चित्रगुप्त म्हणती करावे काई । यमदूताविण न चले कांही ॥१॥
नामे नागविले नामे नागविले । यम म्हणे माझे सामर्थ्य न चले ॥२॥
यम चित्रगुप्त नाम विवंचीत । नम विवंचितां जाले मुक्त ॥३॥
यमें यमदुता आल्हादे भेटी । अवघे चतुर्भुज झाले वैकुंठीं ॥४॥
जनामाजी थोर दाटुगें नाम । यमें यमदूत झाले आत्माराम ॥५॥
एका जनार्दनी नामाचा गुण । यमेसी यमलोक जाला परब्रह्मा पूर्ण ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग