वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 167. गोणाई व नामदेव यांचा संवाद

अगा ये विठोबा पाहे म

🙏 4. संत नामदेव · ABH-082521 · अभंग क्र. १२७०

1270.
अगा ये विठोबा पाहे मजकडे | का गा केले वेडे बाळ माझे ॥१॥
तुझे काय खादले त्वा काय दिधले | भले दाखविले देवपण ॥२॥
आम्ही म्हणू तू रे कृपाळू अससी | आता तू कळलासि पंढरिराया ॥३॥
का देवपण आपुले भोगू पै जाणावे | भक्ता सुख द्यावे हेळामात्र ॥४॥
देव देव होऊनिया अपेष का घ्यावे | माझे का बिघडावे एकुलते बाळ ॥५॥
तू कैसारे देव या देशावेगळा | बाधिंते तुझा गळा परि संता भ्याले ॥६॥
तुझी करणी अवची आम्हा ठाउकींचे आहे | बोलोनिया काय हलकट व्हावे ॥७॥
जाणोनी पुंडलिक तुझी न पाहेचि वास | तू भला नव्हेस वरघेणा ॥८॥
तो बैस पै न म्हणे तुज याचकाकरणे | जडसी जीवेप्राणे सात्विकभावे ॥९॥
झणी तू आपुला करिसी बोभाट | मग येईल वीट लोकाचारी ॥१०॥
थोरपणे नामा करी मज आधीन | गोणाई म्हणे चरण धरिन तुझे ॥११॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग