अरे विठोबा आता पाहे
1285.
अरे विठोबा आता पाहे मजकडे | कारे केले वेडे बाळ माझे ॥१॥
तुझे उच्छिष्ट खादले त्वा काय. दिधले | भले दाखविले देवपण ॥२॥
आधी त्वा तयाचे भोगू पै जाणावे | भक्ता सुख द्यावे आनंदाचे ॥३॥
गोणाई म्हणे देवा तुज बांधले दावे | तरी तुज भ्यावे लागे संता ॥४॥
