माझे घर तुवा पुर्वीच
1281.
माझे घर तुवा पुर्वीच बुडविले | जे दर्शनासी आले बाळ माझे ॥१॥
नेणो काय वर्म तुझे सांपडले हाती | रिघालासी चित्ती जेणे द्वारे ॥२॥
लौकिक परिहार देसील कासया | मी तुज ऐसिया बरवे जाणे | |३ ॥कटी ठेउनि कर उभा गरुडपारी | हे तव अंतरी हारपला ॥४॥
नाही चळणवळण न लावी पात्या पाते | लागले निरूते लक्ष तुझे ॥५॥
तुझी याची खूण अंतरींची एकी | दाविसी लौकिकी भिन्नपण ॥६॥
सांडियेली येणे लौकिंकांची लाज | नव्हे माझा मज काही केल्या ॥७॥
तुझेंनि सुखे धाला आनारिसा जाला | अभिमान मावळला समूळ याचा ॥८॥
देही पै असोनी विदेही दिसत | प्रेमे वोसंडत हृदयकमळी ॥९॥
तू अनाथा कैवारी ऐसी वेदवाणी | परी का नये अजोनी कणव तुज ॥१०॥
गोणाई म्हणे माझा नामा देई हाती | लागेन पुढता-पुढती तुझे पायी ॥११॥
