हरी त्वा कोणाचे बरवे
1286.
हरी त्वा कोणाचे बरवे केले | पूर्ण आम्हा कळो आले ॥१॥
नारद वैष्णव जगजेठी | त्यांसी लाविली लंगोटी ॥२॥
मयुरध्वज राजा भला | त्यासि करेवती घातला ॥३॥
बळी दानशीळ भला | तुवा पाताळी घातला ॥४॥
भीष्म वैष्णवांचा राव | त्यांची बाणे पूजिला ठाव ॥५॥
रुक्मांगद हरिचा दास | त्याचा गांवच केला वोस ॥६॥
बाळ एकुलते एक | ते त्वा ज्ञानीच केला शुक ॥७॥
उपमत्यु बाळक पाहे | क्षीरसागरी कोंडले आहे ॥८॥
ध्रुरू बाळक गोजिरवाणे | त्याचे खटले येणे जाणे ॥९॥
हरिश्चंद्र ताराराणी | डोंबा घरी वाहे पाणी ॥१०॥
प्रल्हाद भक्तीचा भुकेली | त्याचा बाप त्वा वधिला ॥११॥
हनुमंत भक्त निकट | त्यांसी केले तू मर्कट ॥१२॥
पुण्यवंत राजा नळ | त्यांचा केला तुवा छळ ॥१३॥
श्रियाळ॑ राजी भला | त्यांचा बाळ त्वा खांदला ॥१४॥
तुज कोणी न म्हणे भले | बाळे पोटीचे कोवळे ॥१५॥
जिकडे तिकडे तुम्ही दोघे | तिकडे तिसरा नामा मागे ॥१६॥
तुज नाही जाती कुळ | जेऊलि भ्रष्टविले बाळ॥१७॥
जेणे तुझे नाम घेतले | ते संसांरावेगळे केले ॥१८॥
|आता जेविसी तरी तुज आण | ऐकोनि हासे जगज्जीवन ॥१९॥
नामा दिला माते हाती | नयन भरले अश्रूपाती ॥२०॥
माय पाहे नामदेव | तव तो जाला केशवराव ॥२१॥
माय म्हणे नये कामा | तुझा ओपिला तुज नामा ॥२२॥
गोणाई म्हणे हरी | तुझी करणी तुजची बरी ॥२३॥
गोणाई व नामदेव यांचा संवाद.
