माझ्या वडिलांची मिरा
1287.
माझ्या वडिलांची मिरासी गा देवा । तुझी चरणसेवा पांडुरंगा ॥१॥
उपवास पारणी राखिला दारवंटा केला । भोगवटा आम्हालागी ॥धृपद॥
वंशपरंपरा दास मी अंकिता । तुका मोकलिता लाज कोणा ॥२॥
अर्थ :
पांडुरंगा तुझ्या चरणाची सेवा करणे ही माझ्या वडिलांची वतनदारी आहे. उपवास करून, पारणे करून माझ्या पूर्वजांनी तुझ्या द्वाराचे रक्षण केले आहे. आणि आम्हाला सुखोपभोग घेण्यासाठी ही वतनदारी ची तरतूद करून ठेवली आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा मी तुझा अंकित दास आहे आणि तुम्ही जर माझी उपेक्षा केली तर याची लाज कोणाला आहे,अर्थात तुमच्याशिवाय कोणाला असणार ?
